ऑल इंडिया बॉडीबिल्डींग स्पर्धेसाठीसुनील मगदूम याची निवड
कोल्हापूर ः मुंबई येथे दि. 9 ऑगस्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलमध्ये भारतीय डाक विभागाअंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोनवडे (ता. करवीर) येथील सुनील मगदूम याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने 85 किलो गटामध्ये ही कामगिरी केली. त्याची पुढील स्पर्धा जयपूर (राजस्थान) येथे होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव सुनीलची निवड झाली आहे. या आधी त्याने ऑल इंडिया व सिव्हील नॅशनलमध्ये 7 पदकांची कमाई केली आहे. त्याला बिभीषण पाटील व भारतीय डाक विभागाचे प्रमुख रूपेश सोनवणे, कापसे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments