Header Ads

Header ADS

कोल्हापुराच्या दातृत्वाचे दर्शन घडविणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील असामान्य संभाजी तात्यांना मानाचा मुजरा! आ. ऋतुराज पाटील

*प्रथमेश वाडकर / प्रतिनिधी*.
कोल्हापूरकरांच्या 'दातृत्वाचे' दर्शन आपल्याला नेहमीच अनुभवायला मिळते. प्रत्येक संकटामध्ये कोल्हापूरकर  आपल्या परीने जमेल ती सर्व मदत करायला आघाडीवर असतात. आज  नेहमीच मदतीसाठी आघाडीवर असणाऱ्या कोल्हापुरातील  संभाजी जाधव तात्यांना भेटलो.

संभाजी पांडुरंग जाधव, राहणार मिठारी मळा, रिंग रोड, कोल्हापूर.  आपल्या  उदरनिर्वाहासाठी संभाजी तात्या पिठाची गिरण चालवतात. समाजकार्याची आणि सत्कार्याची ओढ लागली की माणूस स्वतःला विसरून त्यात वाहून घेतो, याची प्रचिती संभाजी जाधव यांनी भेटून येते. 

माणसाचा शेवटचा प्रवास व्यवस्थितपणे  व्हावा, यासाठी जाधव तात्यांनी स्वखर्चातून तयार केलेली 'वैकुंठरथ' ही शववाहिका मोफत लोकांसाठी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे ते स्वतः ही शववाहिका चालवतात.

या वैकुंठरथाची बांधणी तात्यांनी अत्यंत कुशलतेने करून घेतली आहे. प्रियजनांचा शेवटच्या प्रवासावेळी  त्यांचे अंतिम दर्शन घ्यायला आलेल्या प्रत्येकाला त्यांचे दर्शन सहजता घेता येऊ शकते.

यापूर्वी, कोरोनाच्या काळामध्ये स्मशानभूमीमध्ये त्यांनी स्वतःची एफडी मोडून ५ हजार शेणी आणि एक ट्रक भरून लाकडे दिली आहेत. एवढेच नाही तर, ९ वर्षाच्या मुलाला थंडीच्या दिवसांमध्ये अत्यंसंस्कार करताना गार पाण्याने आंघोळ करून कुडकुडताना पाहून तात्यांनी स्मशानमभूमीमध्ये सोलरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

No comments