Header Ads

Header ADS

सफाईगार कामासाठी सेवा सहकारी संस्थांनी30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - आ. बा. तांबोळी


           

            सांगली, दि. 22,  औद्योगिक प्रशिक्षण संस्थाआटपाडी या आस्थापनेमध्ये 11 महिने कालावधीसाठी सफाईगार या कामासाठी सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून यासाठी मानधन / वेतन 493 रूपये प्रतिदिन आहे. हे काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थानी अपले इच्छापत्रासह प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमध्यवर्ती प्रशासकीय इमारतविजयनगरसांगली येथे सादर करावेतअसे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  अधिकारी आ. बा. तांबोळी यांनी केले आहे.

        अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहनही श्री. तांबोळी यांनी केले आहे.

No comments