Header Ads

Header ADS

*रस्त्याच्या मध्यभागी असलेला तो धोकादायक विधुत खांब अखेर स्तलांतरीत .**माजी आमदार चंद्रदीप नरके व अजय वाडकर सरपंच मयूर जांभळे यांच्या प्रयत्नाला यश*

  .
  बालिंगे. ता करवीर. येथील श्री. गणेश मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या अंगणवाडी इमारती समोर रस्त्यावर  मध्यभागी 33 हजार के. व्ही. विधुत प्रवाह सुरु असलेला खांब वाहतुकीसाठी अडथळा ठरत होता. या खांबामुळे अनेक वाहने धडकून अपघात घडले याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते व युवा सेना करवीर अध्यक्ष अजय वाडकर. यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके. यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून सरपंच मयूर जांभळे. व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 13/04/ 2018  च्या पत्राने हा धोकादायक खांब स्तलांतर करणे बाबत दिले पत्राची दखल घेऊन सन 2022 च्या जानेवारी महिन्यात हा खांब विधुत वितरण कंपनीकडून स्तलांतर करण्यात आला.त्या विधुत खांबाची उंची पूर्वीच्या खांबापेक्षा 20 फुटाने जादा उंची वाढविण्यात आली. त्यामुळे भविष्यातील धोका टळला आहे.
 तीस फूट रस्त्यावर असणारा हा  धोकादायक विधुत खांब यामुळे वाहन चालक व प्रवाशी यांना अडथळा ठरत होता. खांब स्तलांतर केल्यामुळे संपूर्ण बालिंगा गावासह वाहन चालकातून केलेल्या कामाचे कौतुक होतं आहे.

No comments