महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. 17 : सर्व महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे. ज्या महाविद्यालयांमध्ये केंद्राची स्थापना झाली नाही, त्यांनी तात्काळ महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत,
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींसह सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्याकरीता सर्व महाविदयालयामध्ये समान संधी केंद्र स्थापन करावयाचे आहे. महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्याबाबत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाकडून वारंवार कळविण्यात आले आहे.
No comments