Header Ads

Header ADS

बालींगा पूरग्रस्तांची जिल्हाधिकारी यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी


बालींगा वार्ताहर :
बालींगा ता.करवीर येथील कात्यायनी वसाहत मधील ग्रामस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना पुनर्वसन करावे यासाठी निवेदन देण्यात आले.
        निवेदनाचा आशय असा की, आम्ही पूरग्रस्त बालींगा गावचे कायमचे रहिवाशी आहोत. ग्रामपंचायतीने प्लॉट पाडून गरीब व गरजू लोकांना देण्यात आले आहेत. सर्व घरांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. भूमापन कार्यालयामार्फत मोजणी होऊन सनद देण्यात आली आहे. आमची वसाहत भोगावती नदीपासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर आहेत.
सन २०१९ व सन २०२१ मध्ये आलेल्या महापुरात आम्हास देण्यात आलेल्या घरात पुराचे पाणी शिरून आमचे आर्थिक व मानसिक तसेच लोकांच्या आरोग्य यांचे नुकसान झाले आहे.या कालावधीमध्ये शासनाकडून देण्यात येणारे पूरग्रस्त अनुदान आम्हास देण्यात आले आहे.
आम्हाला ग्रामपंचायतीने दिलेल्या क्षेत्रफळ व सनद प्रमाणे मालकी ताबा सहित घरांचे पुनर्वसन करावे.तसेच सन २०१९ पासून सलग दोन वर्षांपूर्वी कोरोना आजाराने थैमान घातले होते.महापूर व कोरोना यामुळे गावातील लोकांना मदत करण्याची इच्छा असताना सुध्दा त्यांना मदत करता आली नाही. आमच्या वस्तीतील लोकांना गावामध्ये भाड्याने घर मिळाले नाही अथवा लोकांनी घरे सुध्दा देण्यास नकार दिला. तरी जेथे पुराचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी आम्हा सर्वांना जागा देऊन आमचे पुनर्वसन करावे असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार करवीर , गटविकास अधिकारी करवीर , भा.ज.पा.पक्षाचे श्री .महालक्ष्मी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आल्या. 
यावेळी नंदकुमार गाडे, शिवाजी वाडकर, राजाराम कोरवी, शामराव कांबळे,  आण्णासो  शिंदे, शहाजी कांबळे, निलेश पाटील, गंगाराम कुराडे, अविनाश कोरवी, संग्राम कांबळे, युवराज जरंडे, चंद्रकांत कांबळे, युवराज बागडी,राम लोणारी, अमर कांबळे, संजय मेथे, शिवाजी कोरवी, नागेश कांबळे, प्रथमेश वाडकर. आदी उपस्थित होते.

No comments